कारंदवाडीत कृषी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:18+5:302021-06-29T04:19:18+5:30

कारंदवाडी (ता. वाळवा) येथे कृषी सप्ताहांतर्गत सावित्री आटुगडे, भगवान माने यांच्यासह शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी केली. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा ...

Agriculture Week in Karandwadi | कारंदवाडीत कृषी सप्ताह

कारंदवाडीत कृषी सप्ताह

कारंदवाडी (ता. वाळवा) येथे कृषी सप्ताहांतर्गत सावित्री आटुगडे, भगवान माने यांच्यासह शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : कारंदवाडी, कृष्णानगर येथे भगवानराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत कृषी सप्ताह साजरा करण्यात आला.

यावेळी सभा, प्रात्यक्षिक, शिवारफेरीचे नियोजन कृषी सहाय्यक सावित्री आटुगडे यांनी केले. सुनील शिंदे यांच्या बांधावर मनरेगा अंतर्गत आंबा लागवड करण्यात आली. लक्ष्मण सावंत यांच्या शेतात सोयाबीन व भुईमूग आंतरपीक एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अनिल सरदेशमुख यांच्या शेतावर ट्रायकस कल्चर, एरंडी आमिष सापळे, हुमणी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक घेण्यात आले. भगवान सरदेशमुख यांच्या शेतावर घरच्या घरी फळमाशी सापळे व मेंटरायझियम प्रात्यक्षिक घेण्यात आले. संजय सरदेशमुख व सुनील सरदेशमुख गांडूळ युनिट बांधकाम प्रकल्पाला भेट, मनिषा पाटील यांच्या ठिबक संच प्लॉटची पाहणी केली. कमल सरदेशमुख यांच्या हळद व मका आंतरपीक प्लॉटमध्ये पक्षी थांबे, ट्रॅप पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले. सदाशिव यादव यांच्या शेतात सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक राबविण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, रमेश खोत, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील शिंदे, अनिल सरदेशमुख, यशवंत सरदेशमुख, दिलीप सरदेशमुख, भगवान सरदेशमुख, संग्राम सरदेशमुख, दिनकर सरदेशमुख, शिवाजी पाटील, बबन रसाळ, सचिन भाेसले, सदाशिव यादव व इतर शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी निंबाळकर व कृषी पर्यवेक्षक एम. एम. घाडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक कारंजकर व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Agriculture Week in Karandwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.