इस्लामपुरात शिवतेज शेतकरी प्रकल्पाला कृषिमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:28+5:302021-04-12T04:25:28+5:30

इस्लामपूर : इस्लामपूर येथील शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने सुरू केलेल्या शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सदिच्छा ...

Agriculture Minister visits Shivtej Shetkari Project in Islampur | इस्लामपुरात शिवतेज शेतकरी प्रकल्पाला कृषिमंत्र्यांची भेट

इस्लामपुरात शिवतेज शेतकरी प्रकल्पाला कृषिमंत्र्यांची भेट

इस्लामपूर : इस्लामपूर येथील शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने सुरू केलेल्या शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्याहस्ते शिव बीज आणि रोपवाटिकेचे लोकार्पण करण्यात आले.

प्रकल्पाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी भुसे यांचे स्वागत करून येथील कामकाजाची माहिती दिली. तसेच भुसे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पेरणीपूर्वीची बीज प्रक्रिया आणि औषध उपचाराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शिवतेजने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून साकारलेल्या रोपवाटिकेची भुसे यांनी पाहणी केली.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने, विशाल पाटील आणि शेतकरी उपस्थित होते.

फोटो : ११ इस्लामपूर ५

ओळ : इस्लामपूर येथील शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीला कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट दिली. यावेळी दिग्विजय पाटील, विशाल पाटील, बसवराज मास्तोळी, भगवानराव माने उपस्थित होते.

Web Title: Agriculture Minister visits Shivtej Shetkari Project in Islampur