त्रिसूत्रीचा वापर केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:33+5:302020-12-14T04:38:33+5:30

विटा येथील शिवप्रताप ॲग्रोटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमार्फत भाळवणी (ता. खानापूर) येथे फिल्ड किंग अवजारांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी प्रतापराव ...

Agribusiness is profitable if the triad is used | त्रिसूत्रीचा वापर केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर

त्रिसूत्रीचा वापर केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर

विटा येथील शिवप्रताप ॲग्रोटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमार्फत भाळवणी (ता. खानापूर) येथे फिल्ड किंग अवजारांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी प्रतापराव साळुंखे बोलत होते. सोनहिरा कारखान्याचे संचालक सयाजीराव धनवडे, शिवप्रताप ॲग्रोमॉलचे अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे, फिल्ड किंगचे रामदास शितोळे उपस्थित होते.

रामदास शितोळे यांनी, फिल्ड किंग रोटावेटर, मलचार नांगर आणि सर्व वस्तू दर्जेदार आहेत. आम्ही शेतकऱ्यांना नेहमी नवीन देत असतो. एकदा शेतकऱ्यांनी फिल्ड किंग प्रॉडक्ट घेतले की तो पुन्हा कोणत्या कंपनीच्या प्रॉडक्टला हात लावत नाही, असे सांगितले.

यावेळी अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, शिवप्रताप ॲग्रोटेक कंपनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली कंपनी आहे. कंपनीचा उद्देश हा शेती उत्पन्नात वाढ करणे, आधुनिक तंत्रज्ञान पुरवणे, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन प्रशिक्षित करणे हा असून याअंतर्गत या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे.

यावेळी भाळवणी परिसरातील शेतकरी, शिवप्रताप ॲग्रोमॉलचे पदाधिकारी, फिल्ड किंग कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. अभिजित भिंगारदेवे यांनी आभार मानले.

फोटो-13vita01

फोटो :

भाळवणी (ता. खानापूर) येथे शिवप्रताप ॲग्रोमॉलच्यावतीने शेतकऱ्यांना शेती अवजारांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी प्रतापराव साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Agribusiness is profitable if the triad is used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.