शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयाही पथकर भरणार नाही, सक्ती केल्यास..; सांगलीत आंदोलन

By संतोष भिसे | Updated: October 2, 2023 16:48 IST

शेतकरी कामगार पक्ष अन् टोलमुक्ती संघर्ष समितीचे सांगलीत आंदोलन

सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील बोरगाव पथकर नाक्याच्या परिसरातील १० गावांना पथकर माफीसाठी शेतकरी कामगार पक्ष व स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. एक रुपयादेखील पथकर भरणार नाही, सक्ती केल्यास महामार्गावरील वाहतूक बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.शेकापचे नेते दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ॲड. अजित सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, रोहित पाटील, प्रा. बाबुराव लगारे, ॲड. सुभाष पाटील, अर्जुन थोरात यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावरील बोरगाव पथकर नाक्याच्या २० किलोमीटर परिघातील गावांना संपूर्ण पथकर माफी द्यावी. रहिवाशांना दिवसभरात अनेकदा नाका ओलांडावा लागतो. त्यांनी प्रत्येकवेळी पथकर भरणे अन्यायकारक आहे. मासिक  पासची सोय असली, तरी दरवर्षी त्याची शुल्कवाढ होते. त्यामुळे तो भरणे शक्य नाही. आंदोलकांच्या मागण्या अशा : महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. खरशिंग फाटा उड्डाण पूल, शिरढोण येथे अग्रणी नदीवर दोन्ही बाजुंना तसेच नरसिंहगाव, अलकुड (एम) येथे सेवा रस्ते, गतिरोधक, महामार्गालगतच्या गावांच्या नावांचे फलक, गावांत जाणारे रस्ते, अपूर्ण गटारी यांचीही कामे पूर्ण करावीत. विठ्ठलवाडी येथील उड्डाण पूल उभारावा. आंदोलनात अरुण भोसले, शशिकांत कदम, प्रशांत कदम, प्रल्हाद गायकवाड, शरद पवार, प्रसाद खराडे, विश्वास साखरे, प्रशांत यादव, सचिन करगणे आदींनी भाग घेतला. 

अधिकाऱ्यांनी आश्वासन पाळले नाहीमागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व आंदोलकांमध्ये बैठक झाली होती. अधिकाऱ्यांनी कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, पण कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सांगलीत सोमवारी आंदोलन झाले.

टॅग्स :Sangliसांगलीtollplazaटोलनाकाagitationआंदोलन