राष्ट्रवादीच्यावतीने चूल पेटवून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:01+5:302021-02-07T04:25:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेट्रोल, डिझेलसह गॅस दरवाढीविरोधात संताप व्यक्त करीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने शनिवारी सांगलीत 'चूल पेटवा' ...

राष्ट्रवादीच्यावतीने चूल पेटवून आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेलसह गॅस दरवाढीविरोधात संताप व्यक्त करीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने शनिवारी सांगलीत 'चूल पेटवा' आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 'इंधन दरवाढ करणाऱ्या शासनाचा निषेध असो', ' महागाईची भेट देणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा देत महिलांनी दरवाढीचा निषेध केला. यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा अनिता पांगम म्हणाल्या की, केंद्र सरकारने एकीकडे पेट्रोल, डिझेल दरवाढीतून महागाईच्या आगीत तेल ओतले. गॅसवरील अनुदान बंद करून सामान्य लोकांचे कंबरडे मोडले. केवळ मोठ्या उद्योगपतींचा विचार करून गरिबांच्या जिवावर हे सरकार उठले आहे. त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो.
गॅसवरील अनुदान तातडीने सुरू करावे, इंधनाचे दर कमी करावेत, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. सरकारने याप्रश्नी पाऊल उचलले नाही, तर महिला आघाडी याप्रश्नी आंदोलन करीत राहील, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनात पांगम यांच्यासह विधानसभा क्षेत्राध्यक्षा डॉ. छाया जाधव, दिव्यांग सेल अध्यक्षा आशा पाटील, असंघटित कामगार अध्यक्षा जयश्री भाेसले, युवती जिल्हाध्यक्षा अमृता चाेपडे, प्रज्ञा ढेरे, राणी कामटे, सुनीता लालवाणी, सुधा कटारे, अमृता सरगर, छाया भिसे, नंदिनी कामटे, वासंती गव्हाणे, नीशा पाटील आदी उपस्थित होते.