शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

युवक काँग्रेसच्या निवडणूक निकालावेळी वादावादी निरीक्षकांना दमबाजी : समर्थकांचा अंगावर धावून जाण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:37 IST

युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले.

सांगली : युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले. पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्यांना दमबाजी करीत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

प्रदेशाध्यक्ष ते जिल्हानिहाय पदाधिकाºयांच्या निवडीसाठी आॅनलाईन मतदान पार पडले होते. प्रदेशव्यतिरिक्त केवळ जिल्ह्यातील पदाधिकाºयांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी सांगलीतील निरीक्षक भगवती प्रसाद यांनी जाहीर केला. सांगलीच्या युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली. आठही विधानसभा क्षेत्राध्यक्षांचे निकाल यावेळी जाहीर करण्यात आले.

सांगली विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये योगेश राणे विजयी झाले. या निवडणुकीत पराभूत झालेले विनायक कोळेकर यांच्यासह समर्थकांनी बोगस मतदानाचा आरोप करीत वाद घातला. बाहेरून मतदार आणून केलेली ही निवड चुकीची असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. निरीक्षक भगवती प्रसाद यांच्याशी कोळेकर यांच्यासह समर्थकांनी हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. अखेर फेरमतदानाच्या लेखी तक्रारीनंतर कार्यकर्ते परतले. वादावादीच्या या घटनेमुळे काँग्रेस भवनातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. काँग्रेस भवनासमोर बराच काळ कोळेकर व त्यांच्या नाराज समर्थकांनी गर्दी केली होती. अन्य पदाधिकाºयांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

यांच्या अंगावर विजयी गुलाल...निवडणुकीत जिल्हाध्यक्ष पदासाठी मंगेश चव्हाण यांनी ३८०३ इतकी सर्वाधिक मते घेऊन बाजी मारली. द्वितीय क्रमांकाची १ हजार ६०५ मते मिळविणारे संदीप जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड केली. जिल्हा सरचिटणीस निवडणुकीत दिनेश सोळगे १ हजार ८०२ मतांनी विजयी झाले.

मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदासाठी संभाजी पाटील (३२५), इस्लामपूर - राजू वलांडकर (१४८ ) जतसाठी विकास माने (४९), खानापूर - जयदीप भोसले (३०७), पलूस-कडेगाव प्रमोद जाधव (८०४), शिराळा- प्रताप घाटगे (६८), तासगाव - महेशकुमार पाटील (३२०) यांच्या निवडी झाल्या.सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी योगेश राणे (२०१ मते) यांनी बाजी मारली. बुधवारी मतदानावेळी सांगली विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक लढविणारे कोळेकर यांनी, निवडणुकीत बाहेरून मतदार आणल्याचा आरोप करीत विरोध केला होता. गुरुवारीही त्यांनी हाच आरोप केला.

निकालादरम्यान जाणीवपूर्वक गटबाजीतून आम्हाला डावलल्याचा आरोप कोळेकर यांनी केला. यावेळी कोळेकर व समर्थक निरीक्षकांच्या अंगावर धावूनही गेले. परंतु उपस्थितांच्या मध्यस्थीनंतर संबंधितांनी लेखी तक्रार देत विषयावर पडदा टाकला. 

निवड कायदेशीरच : भगवती प्रसादवादावादीच्या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना भागवती प्रसाद म्हणाले, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवड कायदेशीररित्या झाली आहे. यात कोणताही घोळ नाही. मतदानात घोळ झाल्याचा आरोप कोळेकर यांच्यासह काहीजणांनी केला आहे. तो चुकीचा आहे. युवकच्या मतदान नोंदणीत फक्त संबंधित युवकांची त्या-त्या जिल्ह्यात नावे घेतली जातात. ते कोणत्या शहराचे आहेत, याची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे ते नोंद असलेल्या क्षेत्रात मतदानास पात्र आहेत. तरीही त्यांची तक्रार वरिष्ठांकडे कळविली आहे.तक्रारीत काय म्हटले आहे...कोळेकर व समर्थकांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आॅनलाईन मतदारांची यादी प्रसिद्ध केली असली तरी, त्यामध्ये मतदारांचा पत्ता दिलेला नाही. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील मतदार याठिकाणी येऊन मतदान करू शकतात. आम्हाला याबाबतच संशय आहे. त्यामुळे मतदारांची पडताळणी करून फेरप्रक्रिया राबवावी. 

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस