जिल्ह्यात दोन हजारांवर मतदारांचे वय वर्षे शंभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:38+5:302021-02-06T04:46:38+5:30
सांगली : अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण २३ लाख ९० हजार ५३७ मतदार नोंदले गेले असून, त्यात वय वर्ष ...

जिल्ह्यात दोन हजारांवर मतदारांचे वय वर्षे शंभर
सांगली : अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण २३ लाख ९० हजार ५३७ मतदार नोंदले गेले असून, त्यात वय वर्ष शंभरी पार केलेले २ हजारांवर मतदार आहेत. याचवेळी नवमतदारांची संख्याही वाढली आहे.
जनगणनेतील नोंदीनुसार जिल्ह्यातील ज्येष्ठांची संख्या सध्या साडेतीन लाखांहून अधिक आहे. वय न समजलेल्या लोकांची संख्या १५ हजारांच्या घरात आहेत. ज्येष्ठांच्या या यादीत शंभरी पूर्ण केलेले एकूण नागरिक २,०२८ इतके आहेत. गेल्या काही वर्षांतील मृतांची संख्या वगळली तरी जनगणनेनंतर आजअखेर नव्याने शंभरीपार करणाऱ्या लोकांचा विचार केल्यास ही मतदारसंख्या दोन हजारांवर गेली आहे. प्रत्येक निवडणुकीत अशा शंभरीपार केलेल्या मतदारांचा मतदानासाठीचा उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळे नवमतदारांप्रमाणे अशा मतदारांच्या मतदानाची आकडेवारीही चांगली आहे.
चौकट
शंभरी पार केलेले लोक
२,०२८
महिला ८८६
पुरुष १,१४२
ज्येष्ठांची संख्या
६० ते ६४ १,०८,९४८
६५ ते ६९ ९२,४२९
७० ते ७४ ७१,४६०
७५ ते ७९ ३६,५८४
८०हून अधिक ४४,५१७
नवमतदार २४ हजारांवर
१ जानेवारी २०२१ आधारित मतदार यादी १५ जानेवारीला प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये २४ हजार ७५३ नवीन मतदारांची नोंद झाली असून, यामध्ये १८ ते १९ या वयोगटातील ९ हजार १११ मतदार आहेत. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित व दुबार अशा एकूण १५ हजार ४५५ मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीमध्ये पुरूष १२ लाख ३१ हजार ३७८, स्त्रिया ११ लाख ५९ हजार ८९, तृतीयपंथी ७० असे एकूण २३ लाख ९० हजार ५३७ मतदार आहेत.