शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

तीन वर्षे तयारी, सांगलीतील सुषमा रेपेंनी दक्षिण आफ्रिकेतील खडतर ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ केली पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:55 IST

आरटीओ कार्यालयातील महिला लिपिक

सांगली : दक्षिण आफ्रिकेतील दरवर्षी होणारी अत्यंत खडतर अशी ९० किलोमीटरची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’सांगलीतील आरटीओ कार्यालयातील महिला लिपिक सुषमा रेपे यांनी वेळेपूर्वी पूर्ण केली.कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित अल्ट्रामॅरेथॉन पैकी एक मानली जाते. या मॅरेथॉनला अंतिम मानवी शर्यत म्हणूनही ओळखले जाते. १९२१ मध्ये ही मॅरेथॉन पहिल्यांदा आयोजित केली गेली होती. यामध्ये जगभरातून स्पर्धक सहभागी होतात. पहिल्या महायुद्धातील शहीद सैनिकांचा सन्मान प्रीत्यर्थ या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. डर्बन आणि पीटरमॅरिट्झबर्ग या शहरादरम्यान घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत लवचिकपणा आणि सहनशक्तीचा कस लागतो.कॉम्रेडस् मॅरेथॉनसाठी भारतातील खेळाडूंना दोन ४२ किमी मॅरेथॉन ४ तास ४० मिनिटांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असते. मूळच्या मुरगूड (जि. कोल्हापूर) येथील आणि सध्या सांगलीत आरटीओ कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत सुषमा रेपे यांनी ४२ किमीच्या दोन मॅरेथॉन पूर्ण करत ४ तास ३० मिनिटात पूर्ण करून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी प्रवेश निश्चित केला होता. डरबन येथे रविवारी डोंगराळ भागात कॉम्रेड मॅरेथॉनसाठी जगभरातून स्पर्धत दाखल झाले होते. ही मॅरेथॉन १२ तासांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असते. सुषमा रेपे यांनी ९० किमी मॅरेथॉन ११ तास २२ मिनिटांत यशस्वी पूर्ण केली.

तीन वर्षे तयारीसुषमा रेपे यांनी जवळपास तीन वर्षापासून कॉम्रेड मॅरेथॉनची तयारी सुरू केली होती. दररोज त्यासाठी सराव सुरू होता. मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीमुळे त्यांना यश मिळाले. ‘अर्हता ग्रुप’ कोल्हापूर येथील प्रशिक्षक आशिष व पंकज रावळू यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सांगली कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, निरीक्षक अमित गुरव यांचे प्रोत्साहन मिळाले.