शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तर पोलिसांचा ताफा आणि ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:06 IST

ब्रेन डेड उद्योजकाच्या अवयवदानानंतर ‘ग्रीन कॉरिडॉर’ने अवयव मुंबईला रवाना

सांगली : सत्तर पोलिसांचा ताफा... सुरूवातीला पोलिसांची गाडी... त्यानंतर रूग्णवाहिका... हृदय घेऊन असलेली रुग्णवाहिका आणि नंतर पोलिसांची गाडी... अवघ्या ३४ मिनिटात कोल्हापुरात जात हृदय मुंबईला रवाना. मेंदूचे काम थांबल्याने येथील एका उद्योजकाच्या अवयवदानाचा निर्णय कुटुंबीयांनी घेत त्याला पोलिस प्रशासनाने साथ दिली. ‘ग्रीन कॉरिडॉर’ने हृदय कोल्हापुरातून खास विमानाने मुंबईला तर इतर अवयव रुग्णवाहिकेतून पुण्याला पाठविण्यात आले.येथील उष:काल रुग्णालयात येथील उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी (वय ४५) यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ब्रेन डेड झाल्याने रुग्णालयाने कुटुंबीयांना विश्वासात घेत अवयवदानाचा प्रस्ताव मांडला. कुटुंबीयांनीही तो मान्य केल्यानंतर याबाबतची तयारी करण्यात आली. सांगली ते कोल्हापूर आणि सांगली ते पुणे या दोन मार्गांवर ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्याचा निर्णय घेण्यात आला.चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या मोदानी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे व ब्रेन डेड असल्याने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण वर्षभरापासून कृत्रिम श्वासावर असून, त्यांना हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याची माहिती रुग्णालयाकडे होती. त्यानुसार तिथे संपर्क साधत पुढील प्रक्रिया करण्यात आली.पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पोलिस प्रशासनाला आदेश दिल्यानंतर ‘ग्रीन कॉरिडॉर’ची तयारी करण्यात आली. हृदय ठराविक वेळेत मुंबईत पोहोचणे आवश्यक असल्याने कोल्हापूरच्या विमानतळावरून खासगी विमानाने ते पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी टीम तयार करत रविवारी दुपारी पावणेदोन वाजता हृदय कोल्हापूरसाठी नेण्यात आले.कोल्हापूर मार्गावर सुरूवातीला पोलिस गाडी, मध्यभागी रुग्णवाहिका आणि त्यानंतर हृदय ठेवलेली रुग्णवाहिका, शेवटी पोलिस गाडी असा निघालेला ताफा ३४ मिनिटांत कोल्हापूर विमानतळावर पोहोचला. त्यानंतर काही वेळातच विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रियाही मुंबईत सुरू करण्यात आली.इतर अवयव अडीच तासात पुण्यातदुसरीकडे अन्य अवयव पुण्यासाठी रवाना झाले. मिरज येथील वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक भगवान पालवे यांनी त्यासाठी नियोजन केले. अवघ्या अडीच तासांत अवयव घेऊन हा ताफा पुण्यात दाखल झाला. पुण्यात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांना याचे प्रत्यारोपण केले जाणार आहे. तर सांगलीतील दोन रुग्णांसाठी नेत्र उपयोगात येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीOrgan donationअवयव दानMumbaiमुंबई