शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

वडिलांनंतर मुलानेही कोरले ‘भारत श्री’वर नाव; सांगलीच्या प्रथमेशला मिस्टर युनिव्हर्समध्ये कास्य, भारत श्री'मध्ये सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 15:29 IST

१९ व्या वर्षीच त्याने मोठे यश मिळवले

सांगली : वडिलांनी १९९४ मध्ये ‘भारत श्री’ आणि ‘महाराष्ट्र श्री’ किताबावर नाव कोरले. तब्बल ३० वर्षानंतर मुलाने वडिलांच्या एक पाऊल पुढे टाकत मिस्टर युनिव्हर्समध्ये कास्यपदक आणि भारत श्री मध्ये सुवर्णपदक मिळवले. यामुळे एकाच घरात दोन भारत श्री बनण्याचा अनोखा विक्रमही नोंदवला गेला. भारत श्री बनलेल्या प्रथमेश आरते याची सांगलीत जंगी मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.तब्बल ३० वर्षापूर्वी रवींद्र आरते यांची पिळदार शरीरयष्टी पाहून अनेक जण या क्षेत्राकडे वळले. तरुण भारत स्टेडियमवर त्यांची तब्येत पाहण्यासाठी अनेक जण यायचे. त्यानंतर व्यायाम करण्याचा निश्चय करायचे. रवींद्र यांनी देश व राज्य पातळीवरील दोन मानाच्या किताबाबरोबर अनेक स्पर्धांतून यश मिळवले.मुलगा प्रथमेश यानेही नाव कमवावे, अशी त्यांची इच्छा होती. प्रथमेशला शालेय जीवनात कबड्डीची आवड निर्माण झाली. तरुण भारत मंडळ व पटेल चौक मंडळाकडून कबड्डी खेळताना त्याने लौकिक मिळवला. कबड्डीच्या व्यायामामुळे त्याची तब्येत सुडौल होती. तशातच त्याला वडिलांप्रमाणे शरीरसौष्ठवची आवड निर्माण झाली. एक ते दीड वर्षातच त्याचे सुडौल शरीर पिळदार बनले.छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मिस्टर युनिव्हर्स या वरिष्ठ गटातील स्पर्धेत २३ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. प्रथमेशने ५५ किलो गटात कास्यपदक पटकावले. त्याचबरोबर तिथेच झालेल्या भारत श्री ज्युनिअरमध्ये ५५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे आरते यांच्या कुटुंबात दोन भारत श्री बनल्याचा वेगळा विक्रम झाला. प्रथमेश याला वडील रवींद्र, प्रशिक्षक भगीरथ राठोड, छत्रपती पुरस्कारविजेते नामदेवराव मोहिते, हणमंत कुकडे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. १९ व्या वर्षीच त्याने मोठे यश मिळवले. सध्या तो जीए कॉलेजमध्ये बी.कॉम. भाग २ मध्ये शिकत आहे. सांगलीत जंगी मिरवणूक काढून त्याचे जल्लोषात स्वागत झाले. 

टॅग्स :Sangliसांगली