शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात २८६५४ मतदार वाढले; पुरुष की महिला, सर्वाधिक संख्या कोणाची.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:52 IST

ऑनलाईन नोंदणीमुळे मतदार संख्या वाढली

सांगली : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील चार महिन्यांत तब्बल २८ हजार ६५४ मतदारांची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक महिला मतदार १७ हजार १०३ वाढले आहेत. विधानसभेवेळी जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार होते. यामध्ये २८ हजार ६५४ मतदारांची वाढ होऊन जुलै २०२५ पर्यंत २५ लाख ६४ हजार ७१९ मतदार नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांनी नावे यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत.गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली. तसेच २० ते २९, २९ ते ४० या वयोगटातील मतदारही वाढले. विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार होते. यामध्ये २८ हजार ६५४ मतदार वाढले आहेत. यामध्ये पुरुष मतदार ११ हजार ५५४ आणि महिला मतदार १७ हजार १०३ वाढले आहेत. या नवीन मतदारांना आगामी जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत वाढलेले मतदार

विधानसभा मतदारसंघ - नोव्हेंबर २०२४ / जुलै २०२५ मिरज - ३४३८७६  / ३४९३१७            सांगली - ३५६४१० / ३६१७५२इस्लामपूर - २८०८५६ / २८३०६२            शिराळा - ३०७०१२ /  ३०९४७३पलूस-कडेगाव - २९२८६६ / २९४२६७खानापूर -  ३५०९९६ / ३५५२६२तासगाव-कवठेमहांकाळ - ३१२६८६ / ३१५८६८            जत - २९१३६३ / २९५७१८एकूण -  २५३६०६५ / २५६४७१९

युवा मतदारांची वाढविधानसभेला १५० तृतीयपंथी मतदार होते. गेल्या आठ महिन्यांत तीन तृतीयपंथी मतदार कमी होऊन सध्या १४७ संख्या झाली आहे. तसेच वाढलेल्या मतदानात बहुतांशी युवा मतदारांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना झालेली ही वाढ पुन्हा चर्चेचा विषय झाली आहे.

मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांनी नावे यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत. मतदार नोंदणी अखंडित चालूच आहे. यामुळेच मतदार संख्या वाढल्याचे दिसत आहे. - नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), सांगली