शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

राणेंच्या दमबाजीनंतर अजित पवारांनी केला बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 12:52 PM

AjitdadaPawar Sangli : रायगडमध्ये केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरुन संताप व्यक्त केला होता. त्यावर टोला लगावतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यापुढे मंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्वाच्या अधिकाऱ्यांऐवजी नोडल अधिकारी उपस्थित राहतील, असा निर्णय घेतल्याचे सांगितले. ​​​​​​​

ठळक मुद्देयापुढे नोडल अधिकारीच देणार माहितीजिल्हाधिकाऱ्यांसह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना गैरहजर राहण्याची मुभा

सांगली : रायगडमध्ये केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरुन संताप व्यक्त केला होता. त्यावर टोला लगावतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यापुढे मंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्वाच्या अधिकाऱ्यांऐवजी नोडल अधिकारी उपस्थित राहतील, असा निर्णय घेतल्याचे सांगितले.नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलनुसार अधिकाऱ्यांना जावेच लागते. त्यात आता उद्यापासून आणखी दौरे वाढणार आहेत. त्यामुळे नोडल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीला मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शवली आहे. नाही तर प्रत्येकजण इथे येऊन, तू कशाला इकडे गेला, तू कशाला तिकडे गेला असे म्हणत बसतील. त्यामुळे त्यांना आता नोडल अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल.ते म्हणाले, पूरस्थिती नियंत्रणात आल्याने मंत्री व नेत्यांचे या भागातील दौरे वाढणार आहेत. मुळात अचानक आलेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांना वेळ देऊन काम करावे लागणार आहे. हे अधिकारी मंत्री, नेत्यांच्या दौऱ्यातच व्यस्त राहिल्यास उपाययोजना करण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यात नोडल अधिकारी उपस्थित राहतील तर, जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून आपले काम करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारNarayan Raneनारायण राणे Sangliसांगली