सांगलीत पैलवानाचा व्यायामानंतर मृत्यू

By Admin | Updated: January 11, 2015 00:38 IST2015-01-11T00:37:44+5:302015-01-11T00:38:09+5:30

कवठेपिरान (ता. मिरज) येथील पैलवान

After the practice of Sangliat Palwana, after death | सांगलीत पैलवानाचा व्यायामानंतर मृत्यू

सांगलीत पैलवानाचा व्यायामानंतर मृत्यू

सांगली : व्यायाम केल्यानंतर कवठेपिरान (ता. मिरज) येथील पैलवानाचा अकस्मिक मृत्यू झाला. धनाजी अण्णासाहेब सावंत-खोचे (वय २१) असे या पैलवानाचे नाव आहे. काल (शुक्रवार) रात्री ही घटना घडली. शवविच्छेदन तपासणीचा व्हिसेरा राखून ठेवल्याने मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याबाबत शहर पोलिसांत नोंद आहे.
धनाजी गेल्या दोन महिन्यांपासून सांगलीच्या गवळी गल्लीतील सरकारी तालीममध्ये कुस्तीचा सराव व व्यायाम करण्यासाठी येत होता. शुक्रवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे आला होता. कुस्तीचा त्याने बराच वेळ सराव केला. त्यानंतर त्याने व्यायाम केला. सपाटे (जोर-उठाबशा) त्याने शंभरपेक्षाही जादा मारल्या. व्यायामानंतर तो तालीमबाहेर आला. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागले. तो तिथेच खाली पडला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: After the practice of Sangliat Palwana, after death