शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद जयंतरावांकडे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 16:14 IST

सांगली : राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याच्या वाट्याला आता दोन मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे पालक मंत्री कोण होणार, ...

ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद जयंतरावांकडे शक्य राज्यमंत्री विश्वजित कदमही पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत

सांगली : राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याच्या वाट्याला आता दोन मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे पालकमंत्री कोण होणार, याविषयीची चर्चा रंगली आहे. अर्थमंत्रीजयंत पाटील यांच्याकडेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येण्याची दाट शक्यता आहे. राज्यमंत्री विश्वजित कदमही पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.भाजपच्या सत्ताकाळात सांगलीचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख या जिल्ह्याबाहेरील नेत्यांकडे होते. त्यापूर्वी पंधरा वर्षे आघाडी सरकारच्या काळात सांगलीचे पालकमंत्रीपद डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. जिल्ह्यातील नेत्याकडेच पालकमंत्रीपद असण्याची परंपरा सांगलीत दीर्घकाळ राहिली; मात्र भाजपच्या सत्तकाळात यात खंड पडला. बाहेरील नेत्यांकडे पालकमंत्रीपद दिल्यामुळे जिल्ह्यास त्यांचा फारसा फायदा होत नसल्याची टीकाही होत होती. कार्यकर्त्यांसह नागरिकांतूनही नाराजी होती.

महापुराच्या काळात तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख जिल्ह्यात फिरकले नसल्याने त्यांना जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. राज्यात आता महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. जिल्ह्याला जयंत पाटील यांच्या माध्यमातून एकच कॅबिनेट मंत्रीपद लाभले आहे. विश्वजित कदम राज्यमंत्री आहेत.

सर्वात ज्येष्ठ नेत्याकडे पालकमंत्रीपद असावे, असा आजवरचा राजकीय संकेत असल्याने आघाडीच्या काळात पतंगराव कदम यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. त्यावेळी जयंत पाटील व माजी मंत्री आर. आर. पाटील यांनीही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला नव्हता. आता जिल्ह्यात ज्येष्ठ नेते म्हणून जयंत पाटील यांच्याकडेच पाहिले जाते. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी विश्वजित कदम यांच्यापेक्षा पाटील यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे.पाटील यांच्याकडे अन्य जिल्ह्याची जबाबदारी सोपविली गेल्यास दुसरा पर्याय म्हणून विश्वजित कदम यांना संधी मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हाती आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वी मुंबईचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे.

त्यामुळे त्यांना अन्य कोणत्या तरी मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र जिल्ह्यात सध्या आघाडीची स्थिती मजबूत असून, ती आणखी मजबूत करण्यासाठी अनुभवी नेता म्हणून पाटील यांना पालकमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलministerमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली