विटा : रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकल्याच्या तक्रारीनंतर शासनाने रद्द केलेला परवाना परत मिळविण्यासाठी कोऱ्या कागदावर ग्रामस्थांच्या सह्या व छायाचित्र घेऊन परस्पर खोटी प्रतिज्ञापत्रे पुणे येथील उपायुक्तांना सादर केल्याप्रकरणी वलखड (ता. खानापूर) येथील उत्तम शंकर जगताप या रेशन दुकानदाराच्या विरोधात आज, शुक्रवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी जगतापच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द केला होता. याविरूध्द त्याने पुणे येथील पुरवठा उपायुक्तांकडे अपील केले. उपायुक्तांनीही त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता.दरम्यान, जगताप याने गावातील ५० ते ६० लोकांना घरी बोलावून, दोन रूपये किलो दराने गहू व तांदूळ देण्याच्या योजनेसाठी एक छायाचित्र व कोऱ्या कागदावर सह्या करून द्या, असे सांगितले. त्यानंतर १०० रूपये मुद्रांकावर खोटे प्रतिज्ञापत्र करून त्यावर लोकांचे छायाचित्र चिकटविले व सह्या केलेल्या कोऱ्या कागदावर, रेशन दुकानदार उत्तम जगताप हे वेळेवर धान्य देत असून ते काळाबाजार करीत नसल्याचे लिहिले. ही प्रतिज्ञापत्रे उपायुक्तांना सादर केली. हे लक्षात आल्यानंतर जगताप याच्याविरूध्द लक्ष्मण नलवडे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)विटा : रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकल्याच्या तक्रारीनंतर शासनाने रद्द केलेला परवाना परत मिळविण्यासाठी कोऱ्या कागदावर ग्रामस्थांच्या सह्या व छायाचित्र घेऊन परस्पर खोटी प्रतिज्ञापत्रे पुणे येथील उपायुक्तांना सादर केल्याप्रकरणी वलखड (ता. खानापूर) येथील उत्तम शंकर जगताप या रेशन दुकानदाराच्या विरोधात आज, शुक्रवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी जगतापच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द केला होता. याविरूध्द त्याने पुणे येथील पुरवठा उपायुक्तांकडे अपील केले. उपायुक्तांनीही त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता.दरम्यान, जगताप याने गावातील ५० ते ६० लोकांना घरी बोलावून, दोन रूपये किलो दराने गहू व तांदूळ देण्याच्या योजनेसाठी एक छायाचित्र व कोऱ्या कागदावर सह्या करून द्या, असे सांगितले. त्यानंतर १०० रूपये मुद्रांकावर खोटे प्रतिज्ञापत्र करून त्यावर लोकांचे छायाचित्र चिकटविले व सह्या केलेल्या कोऱ्या कागदावर, रेशन दुकानदार उत्तम जगताप हे वेळेवर धान्य देत असून ते काळाबाजार करीत नसल्याचे लिहिले. ही प्रतिज्ञापत्रे उपायुक्तांना सादर केली. हे लक्षात आल्यानंतर जगताप याच्याविरूध्द लक्ष्मण नलवडे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)
रेशन दुकानदाराकडून बोगस प्रतिज्ञापत्र
By admin | Updated: January 23, 2015 23:42 IST