शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:36 IST

एसटीमध्ये झालेला प्रदीर्घ संप हा एसटी कामगारांच्या मागण्यांचे रूपांतर राजकीय पोळी भाजण्यासाठी कसे झाले हे आता कामगारांच्या लक्षात आले

सांगली : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळेच एसटीचे कंबरडे मोडल्यामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फरपट चालू आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश हंकारे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.हंकारे म्हणाले की, कोरोना आणि प्रदीर्घ संपातून एसटी आजही सावरलेली नाही. एसटीमध्ये झालेला प्रदीर्घ संप हा एसटी कामगारांच्या मागण्यांचे रूपांतर राजकीय पोळी भाजण्यासाठी कसे झाले हे आता कामगारांच्या लक्षात आले आहे. ॲड. सदावर्ते, पडळकर आणि खोत यांनी एसटी कामगारांचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी आंदोलन करणारे सत्तांतर होताच शांत झाले आहेत. आता गप्प कसे? एसटी कर्मचाऱ्यांचा पुळका असणारे सदावर्ते, पळकर, खोत हे नेते कर्मचाऱ्यांचा बळी जात असताना गप्प कसे बसले आहेत? उच्च न्यायालयाकडे राज्य शासनाने महिन्याच्या १० तारखेपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला ३६० कोटी रुपये वर्ग केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र ठाकरे सरकारच्या काळात दाखल केले होते. तरीही शिंदे-फडणवीस सरकार महिन्याला ३६० कोटी रुपये एसटीला देत नाहीत. यामुळेच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत.

यामुळेच आर्थिक संकटातील कवठेमहांकाळ आगाराचा चालक भीमराव सूर्यवंशी यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस जबाबदार कोण, असा सवालही हंकारे यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर सदावर्ते, पळकर, खोत काहीच बोलत नाहीत. पडळकर, खोत हे नेते तर सत्तेत असतानाही गप्प आहेत, असा आरोपही त्यांनी केला.मुख्यमंत्री यांच्याकडे निधीची मागणीकामगार प्रश्नाचे राजकारण न करता न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दरमहा एसटी महामंडळास ३६० कोटी रुपये द्यावेत. तसेच कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत व्हावेत, यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे केली आहे, अशी माहितीही प्रकाश हंकारे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSadabhau Khotसदाभाउ खोत Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते