शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या ७ हजार ३७० कोटींच्या सुधारित खर्चास प्रशासकीय मान्यता, हिवाळी अधिवेशनात मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 11:50 IST

मंजुरीनंतर जल्लोष अन् राजकीय श्रेयवादही

सांगली/नागपूर : टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील वंचित ५३ गावांचा नव्याने समावेश झाल्यामुळे योजनेचा सुधारित खर्च सात हजार ३७० कोटींवर गेला आहे. या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी प्रशासकीय मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभू सिंचन योजनेवर आजअखेर तीन हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच, तीन हजार ७०० कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मंजुरी मिळाली आहे. पण, खानापूर तालुक्यातील १५, आटपाडी १३, तासगाव १३, कवठेमहांकाळ ८ आणि जत ४ अशी ५३ गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने वंचित ५३ गावांना पाणी देण्यासाठीचा सुधारित सात हजार ४७५ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

१.२१ लाख हेक्टर शेती पाण्याखाली येणारया मंजुरीमुळे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एक लाख २१ हजार ४७५ हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. यासाठी अतिरिक्त ८ टीएमसी पाणी लागणार आहे. या योजनेंतर्गत माण-खटाव तालुक्यांसाठी २.५ टीएमसी, सांगली जिल्ह्यासाठी ४.५ टीएमसी आणि सांगोला तालुक्यासाठी एक टीएमसी जादा मिळणार आहे. या सुधारित खर्चासह अतिरिक्त आठ टीएमसीच्या पाण्यासही केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

मंजुरीनंतर जल्लोष अन् राजकीय श्रेयवादहीटेंभू योजनेच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मंजुरी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाल्यानंतर भाजपचे खासदार संजय पाटील, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी विटा शहरात एकच जल्लोष केला. या दोन्ही नेत्यांच्या आटपाडी, तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्येही सोशल माध्यमांवर श्रेयवादाचे राजकारण चांगलेच पेटले होते.

टॅग्स :SangliसांगलीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन