शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील हिप्परगी, अलमट्टीतील बेकायदेशीर पाणीसाठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; महापूर नियंत्रण समितीचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Updated: July 13, 2024 18:56 IST

सांगली, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याविरोधात याचिका दाखल करणार

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाण्याचा साठा केला आहे. त्याकडे सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि जलसंपदाचे कार्यकारी अभियंता पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. या अधिकाऱ्यांची भूमिका कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना महापूर येण्याच्यादृष्टीने आहे. म्हणून त्यांना नोटिसा दिल्या असून, भविष्यात त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता म्हणाले, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश या संघटनांतर्फे ॲड. ओंकार वांगीकर यांनी ही नोटीस दिली आहे. जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाला महापुराच्या संकटाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कायदेशीर नोटीस दिली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना वारंवार पत्रे, सूचना पत्रे, इशारा पत्रे दिली आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कर्नाटकातील जलसंपदा विभागाबरोबर व प्रशासनाबरोबर समन्वय ठेवा, अशी सूचना दिली होती. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाण्याची पातळी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेवली जात आहे की नाही, याकडे बारकाईने लक्ष ठेवा. तसे आढळले नाही तर तातडीने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून पाण्याची पातळी कमी करायचा आग्रह धरण्याची सूचना मुख्यमंत्री शिदे यांनी दिली होती. परंतु दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन, कार्यकारी अभियंता यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यात पाणीसाठा नियमबाह्यरीत्या वाढतच आहे. पावसाचे प्रमाण यापुढे वाढत जाणार आहे. साहजिकच कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, राधानगरीसह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवावा लागणार आहे. त्यामुळे महापुराचा सांगली व कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना फटका बसणार आहे. म्हणून कोल्हापूर, सांगली जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नोटिसा बजावल्या आहेत. यातूनही त्यांनी महापूर रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर त्यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत कसोटीचा काळकृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आता पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. १५ जुलै ते १५ ऑगस्ट हा अत्यंत कसोटीचा काळ आहे. आतापासूनच जिल्हा प्रशासनाने, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसKarnatakकर्नाटकDamधरणfloodपूर