कोरोनाशी मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST2021-04-05T04:24:14+5:302021-04-05T04:24:14+5:30
कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयात सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कोरोनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यानंतर ...

कोरोनाशी मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज
कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयात सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कोरोनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, महेंद्र लाड, युवा नेते डॉ. जितेश कदम, प्रांताधिकारी गणेश मरकड, कडेगावच्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विश्वजित कदम म्हणाले राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल. लोकांनीही आरोग्य विभागास सहकार्य करीत लसीकरण करून घ्यावे. कडेगाव ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे, तर चिंचणी येथील शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर कडेगाव तालुक्यात १४ आणि पलूस तालुक्यात नऊ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली आहेत, असे डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
यावेळी पलूसच्या गट विकास अधिकारी स्मिता पाटील, पलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव, कडेगावचे मुख्याधिकारी कपिल जगताप, कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी आशा चौगुले, पलूस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे, डॉ. सागर जाधव, डॉ. अधिक पाटील, चिंचणीचे सहायक पाेलीस निरीक्षक संतोष गोसावी, कडेगावचे सहायक पाेलीस निरीक्षक संदीप साळुंखे, कुंडलच्या सहायक पाेलीस निरीक्षक संगीता माने आदींसह आरोग्य, महसूल व पोलीस
आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.