इस्लामपुरात व्यापाऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:28 IST2021-04-07T04:28:17+5:302021-04-07T04:28:17+5:30

इस्लामपूर येथे व्यापारी महासंघाच्या वतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी संजय ओसवाल, शाकीर तांबोळी, मोहन पाटील, दिनेश पोरवाल, रवी ...

Administration protests by traders in Islampur | इस्लामपुरात व्यापाऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध

इस्लामपुरात व्यापाऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध

इस्लामपूर येथे व्यापारी महासंघाच्या वतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी संजय ओसवाल, शाकीर तांबोळी, मोहन पाटील, दिनेश पोरवाल, रवी सूर्यवंशी, अजित रायगांधी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनसंदर्भात रोज एक नवीन नियम जाहीर करून संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रशासनाचा येथील व्यापारी महासंघातर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

गांधी चौकामध्ये सायंकाळी जमलेल्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे निर्णय हे जनतेच्या हितविरोधी आहे. नागरिक, व्यापारी, उपाहारगृह चालक, रोजंदारीवर काम करणारे मजूर असे सगळे घटक अस्वस्थ झाले आहेत. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबविताना जनता आणि व्यापारी यांना त्रास होणार नाही, अशी भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी, व्यापारी महासंघाचे मोहन पाटील, संजय ओसवाल, अजित रायगांधी, शरद रावळ, रवींद्र सूर्यवंशी, विजय कोठारी, दिनेश पोरवाल, गोपी कोठारी, गुरुराज माने उपस्थित होते.

Web Title: Administration protests by traders in Islampur