इस्लामपूर : ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे बालसदस्यांसाठी संगणक प्रशिक्षण देणाऱ्या सॉफ्टेक कॉम्प्युटर्सच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये आदित्य पन्हाळकर, प्रज्ज्वल माळवदे, अथर्व खामकर, सायली जाधव या विजेत्या ठरल्या. पन्हाळकर दुहेरी विजेतेपदाचा मानकरी ठरला. सॉफ्टेक कॉम्प्युटर्सतर्फे ‘लोकमत’ बाल विकास मंच सदस्यांना मोफत संगणक प्रशिक्षणादरम्यान सदस्यांसाठी ‘पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनचरित्रावर आधारित वीरपुरुष प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. लहान व मोठ्या गटात झालेल्या या आॅनलाईन स्पर्धेला उत्स्फूूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गटात शार्दूल विनोद भास्कर याने द्वितीय, राधिका वसंत पाटील हिने तृतीय क्रमांक पटकाविला. मोठ्या गटात ओंकार महादेव कदम याने द्वितीय, तर नवीन अय्याज इबुशे, प्रतीक प्रकाश पवार व ओम अभय शहा यांना विभागून तृतीय क्रमांक दिला.‘मला रोबोट मिळाला तर’ यावरील निबंध स्पर्धेत लहान गटात श्रेणिक संजय देसाई याने द्वितीय, तर मोठ्या गटात मिताली शीतल निलाखे हिने द्वितीय, खुशी नितीन देशमुख हिने तृतीय क्रमांक मिळविला.विजेत्यांना डबींग कलाकार सायली शहा (पुणे) यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले. पल्लवी चिपरीकर यांनी परीक्षण केले. लक्ष्मी पुजारी व श्रध्दा जाधव यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. सॉफ्टेकच्या सौ. संगीता शहा यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)
आदित्य पन्हाळकर, प्रज्ज्वल माळवदे, अथर्व खामकर, सायली जाधव विजेते
By admin | Updated: February 2, 2015 00:15 IST