कार्वेच्या सरपंच संगीता मुदुगडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:09+5:302021-01-13T05:09:09+5:30
ऐतवडे बुद्रुक : कार्वे (ता. वाळवा) येथील लोकनियुक्त सरपंच संगीता विठ्ठल मुदुगडे यांना कोल्हापूर येथे ग्रुप ऑफ मीडियाकडून ...

कार्वेच्या सरपंच संगीता मुदुगडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
ऐतवडे बुद्रुक : कार्वे (ता. वाळवा) येथील लोकनियुक्त सरपंच संगीता विठ्ठल मुदुगडे यांना कोल्हापूर येथे ग्रुप ऑफ मीडियाकडून सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीता मुदुगडे या तीन वर्षांपासून सरपंच आहेत. त्यांनी गावाला स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शासनस्तरावरील विविध योजनांची अंमलबजावणी करून विकासकामांमध्ये गाव अग्रेसर ठेवले आहे. महिला बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिलांना प्रगतीच्या प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण केले आहे. कोविडकाळात कोरोनाविरुद्ध लढाईत प्रभावीपणे काम केले आहे. आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रश्न, प्रशासकीय योजना अशा प्रकारे सामान्य माणुूस केंद्रबिंदू मानून काम केले आहे. याची दखल घेऊन संगीता मुदुगडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्जेराव भगत, बाबासाहेब कांबळे, विठ्ठल गडकरी उपस्थित होते.
फोटो - १००१२०२१-आयएसएलएम-कार्वे सत्कार न्यूज कार्वे (ता. वाळवा )येथील सरपंच संगीता मुदुगडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.