शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, सांगलीतील इस्लामपुरात ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली

By श्रीनिवास नागे | Updated: November 17, 2022 13:43 IST

आवाहन करुनही आज ऊसतोड आणि उसाची वाहतूक होत असल्याचे दिसल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले

सांगली : या हंगामात उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद आंदोलनाच्या पहिल्या दिवशी हुतात्मा आणि राजारामबापू कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरली. इस्लामपूर-वाळवा रस्त्यावर बैलगाड्यांच्या चाकातील हवा सोडली तर बावची फाट्यावर राजारामबापूकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर पोलिसांसमक्ष परत पाठवले.उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानीने आज आणि उद्या दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्यापूर्वी वाळवा-शिराळा तालुक्यातील सर्व कारखान्याच्या व्यवस्थापनाना निवेदन देऊन आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते. मात्र तरीसुद्धा आज ऊसतोड आणि उसाची वाहतूक होत असल्याचे दिसल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.हुतात्मा कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या रोखून कार्यकर्त्यांनी चाकातील हवा सोडून ही वाहतूक रोखली. त्यानंतर बावची फाट्यावरून राजारामबापू कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेले ट्रॅक्टर रोखून पोलिसांदेखत त्यांना परत फडात जाण्याची विनंती करत ही ऊस वाहतुकसुद्धा रोखली. आता जिथे ऊसतोड सुरू आहे ती बंद पाडण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने फडात घुसणार आहेत. त्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे हे ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने