राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:24+5:302021-07-14T04:31:24+5:30

इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी शहाजी पाटील, संदीप पाटील, ...

Activists of the Nationalist Minority Cell should keep in touch with the people | राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क ठेवावा

राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क ठेवावा

इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी शहाजी पाटील, संदीप पाटील, शकील जमादार, बशीर मुल्ला, संदीप माने, प्रदीप थोरात उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी सामान्य माणसांशी संपर्क व संवाद ठेवत त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.

येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रतीक पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, युवा नेते संदीप पाटील, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष शकील जमादार, नगरसेवक बशीर मुल्ला, संदीप माने, प्रदीप थोरात उपस्थित होते.

शहर अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष धीरज अवसरे, वसीम मुल्ला, सचिव अल्ताफ जमादार, सरचिटणीस रमजान मुलाणी, चिटणीस मानसिंग कांबळे, सहचिटणीस सलमान मुल्ला, समेद करांडे, सदस्य गौरव बर्डे, अफताब मुजावर, अल्तमश कोतवाल, आयुब पठाण, जुबेर बारस्कर, मुबारक पठाण यांचा नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

शहराध्यक्ष शकील जमादार यांनी स्वागत केले. जमीर मगदूम यांनी आभार मानले.

Web Title: Activists of the Nationalist Minority Cell should keep in touch with the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.