मिट्टी सत्याग्रहासाठी कार्यकर्ते मिरजेतून दिल्लीस रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:39+5:302021-04-05T04:23:39+5:30
मिरज : राष्ट्र सेवा दलातर्फे मिट्टी सत्याग्रह अभियानांतर्गत क्रांतिकारकांचे रक्त व शेतकऱ्यांच्या घामाने भिजलेली जिल्ह्यातील माती घेऊन राष्ट्रीय संघटक ...

मिट्टी सत्याग्रहासाठी कार्यकर्ते मिरजेतून दिल्लीस रवाना
मिरज : राष्ट्र सेवा दलातर्फे मिट्टी सत्याग्रह अभियानांतर्गत क्रांतिकारकांचे रक्त व शेतकऱ्यांच्या घामाने भिजलेली जिल्ह्यातील माती घेऊन राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम, बाबासाहेब नदाफ, शहाजी गोंगाणे, मिलिंद कांबळे व शाहिस्ता मुल्ला हे दिल्लीत शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मिरजेतून रेल्वेने दिल्लीस रवाना झाले.
दिल्लीत चार महिने शेतकरी न्याय व हक्काच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनास पाठिंब्यासाठी महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहाप्रमाणे देशभरातील क्रांतिकारकांचे रक्त शेतकऱ्यांच्या घामाने भिजलेली माती घेऊन जनजागृतीकरिता सांगली जिल्ह्यात राष्ट्र सेवा दलातर्फे राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम बाबासाहेब नदाफ, शहाजी गोंगाणे, मिलिंद कांबळे व शाहिस्ता मुल्ला यांनी कलापथकाद्वारे गीते सादर करून प्रबोधन केले. मालगाव येथे हुतात्मा रामचंद्र कृष्णा सुतार व सिंदूर (ता. जत) येथे क्रांतिकारक सिंदूर लक्ष्मण व त्यांच्या परिवाराच्या हस्ते गोळा केलेल्या पवित्र मातीचा स्वीकार करण्यात आला. शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन व दांडी सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देत ६ एप्रिल रोजी दिल्ली येथील कार्यक्रमात राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.