शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होणार, २५ एप्रिलच्या बैठकीत होणार निर्णय

By अविनाश कोळी | Updated: April 23, 2024 16:16 IST

महाविकास आघाडीत मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्याची मागणी होती

सांगली : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात सांगली लोकसभेची जागा उद्धवसेनेला मिळाली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा, अशा सूचना त्यांना काँग्रेसकडून देण्यात आल्या. मात्र, सोमवारी विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतलेल नाही. त्यामुळे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर दि. २५ एप्रिल रोजी कारवाई होणार आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली. काँग्रेसच्या या बैठकीमध्ये विशाल पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्याची मागणी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला नाही, म्हणून काँग्रेसकडून त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होऊ शकते, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेस