आष्ट्यात झाडे जाळणाऱ्यांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:00+5:302021-01-02T04:23:00+5:30

आष्टा : आष्टा शहरातील शिंदे चौक ते पोलीस ठाणे कर्मवीरनगर मार्गावर श्री चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे ...

Action will be taken against those who burn trees in Ashta | आष्ट्यात झाडे जाळणाऱ्यांवर कारवाई होणार

आष्ट्यात झाडे जाळणाऱ्यांवर कारवाई होणार

आष्टा : आष्टा शहरातील शिंदे चौक ते पोलीस ठाणे कर्मवीरनगर मार्गावर श्री चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली आहेत; मात्र काही नागरिक झाडे जाळत असल्याने संबंधितांवर पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे.

श्री चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मागील दोन ते तीन वर्षांपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली आहेत. प्रत्येक रविवारी पालिकेच्या सहकार्याने पाणी घालत आहेत, तर ट्रस्टचे पदाधिकारी स्वखर्चातून झाडाच्या भोवतीचे तण काढणे, औषधे, खत घालणे ही कामे करीत आहेत. मात्र काही लोक या मार्गावरील झाडे काढून टाकत आहेत. एका ठिकाणी कचरा टाकून जाळीसह झाड पेटवून दिले आहे. संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

Web Title: Action will be taken against those who burn trees in Ashta