शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनची कामे मुदतीत न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:10 IST

जिल्हा नियोजनच्या कामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

सांगली : जिल्हा प्रशासनाच्या २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर प्रशासकीय कामे तातडीने सुरू करून गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच ठेकेदारांनी वेळेत आणि दर्जेदार कामे केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. चालू आर्थिक वर्षातील प्रस्तावित कामांचे प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपवनसंरक्षक सागर गवते, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिले. यंत्रणांनी प्राधान्यक्रम ठरवून शाश्वत विकास साधावा. पूर्ण झालेल्या कामांची पडताळणी करण्यासाठी पालकमंत्री व पालक सचिव प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. ठेकेदारांनी निकृष्ट कामे केलेली दिसून आल्यास त्यांना काळ्या यादीत टाकावे, असे आदेशही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

महिला, पर्यावरण आणि पाणी व्यवस्थापनावर भरमहिला व बालविकास विभागाने एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करावे, तसेच स्वयंसहाय्यता गटांना सक्षम करण्याची गरज आहे. शासकीय कार्यालयांत सौरऊर्जा वापर वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, तर पाटबंधारे विभागाने पूर संरक्षक भिंती व घाट बांधकामे वेळेत पूर्ण करावीत. वन विभागाने वनपर्यटनाचा आराखडा तयार करावा, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

ऑनलाइन युनिक आयडी अनिवार्य२०२५-२६ च्या जिल्हा नियोजन योजनेसाठी सप्टेंबरअखेर प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी सर्व यंत्रणांनी ऑनलाइन युनिक आयडी घ्यावा, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. २०२४-२५ च्या मंजूर, परंतु प्रलंबित कामांसाठी १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी निविदा जाहीर करून कार्यारंभ आदेश द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

विविध विभागांचा आढावापालकमंत्र्यांनी पोलिस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा, क्रीडा, महिला व बालविकास, वन, पर्यटन यासह विविध विभागांच्या २०२३-२४ व २०२४-२५ च्या कामांचा निधी, खर्च व प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीमुळे सांगलीच्या विकासाला स्पष्ट दिशा मिळाल्याने ग्रामस्थांना वेळेवर व शाश्वत सेवा असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.