विट्यात वाय-फायसाठी कार्यवाही सुरू

By Admin | Updated: September 22, 2015 00:09 IST2015-09-21T23:09:33+5:302015-09-22T00:09:03+5:30

वैभव पाटील : एलईडी विद्युतीकरणाचे उद्घाटन; आॅनलाईन तक्रारीचे आवाहन

Action for Wi-Fi in Brick continues | विट्यात वाय-फायसाठी कार्यवाही सुरू

विट्यात वाय-फायसाठी कार्यवाही सुरू

विटा : विटा नगरपरिषद शहरात फोर जी वाय-फाय सुविधा देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही सुरू केली असून, विटेकर नागरिकांनी पालिकेबाबतच्या सर्व तक्रारी आॅनलाईन नोंदवाव्यात. त्यांची तातडीने दखल घेतली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.नगरपरिषदेच्यावतीने शहरातील कऱ्हाड रोडवरील एलईडी विद्युतीकरणाचे उद्घाटन नगराध्यक्ष पाटील यांच्याहस्ते व माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याप्रसंगी नगराध्यक्ष पाटील बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी, महावितरणचे सहायक अभियंता एस. आर. सदामते, श्री. सदानंद, नगरसेवक अ‍ॅड. सचिन जाधव, दहावीर शितोळे, प्रतिभा चोथे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
सदाशिवराव पाटील म्हणाले, विटा शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जे जे राज्यात आहे, ते ते आपल्या विटा शहरात असले पाहिजे, अशी भूमिका घेऊन काम करीत आलो आहे आणि यापुढेही असेच काम केले जाईल.
नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास प्रशांत कांबळे, जगन्नाथ पाटील, अविनाश चोथे, सचिन शितोळे, पांडुरंग शितोळे, सयाजीराव शितोळे, भानुदास शितोळे, सुजित पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक दहावीर शितोळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Action for Wi-Fi in Brick continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.