लेंगरेत विनाकारण, मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:34+5:302021-04-18T04:25:34+5:30

लाेकमत न्युज नेटवर्क लेंगरे : लेंगरे (ता. खानापूर) येथे शनिवारी महसूल विभाग, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून ...

Action on unlicensed, unlicensed walkers | लेंगरेत विनाकारण, मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

लेंगरेत विनाकारण, मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

लाेकमत न्युज नेटवर्क

लेंगरे : लेंगरे (ता. खानापूर) येथे शनिवारी महसूल विभाग, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून गावात संचारबंदी असताना विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी अशा लाेकांची तात्काळ कोरोना रॅपिड टेस्ट सुरू केली. सकाळीच प्रशासन सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे काही वेळातच रस्ते रिकामे झाले.

प्रांताधिकारी संतोष भोर, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे यांनी सकाळीच गावास भेट देत कारवाई सुरू केली. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे प्रांताधिकारी संताेष भाेर यांनी यावेळी सांगितले. अमोल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी चव्हाण, आरोग्य सेवक माळवे, शिंगाडे आशा सेविका व सरपंच राधिका बागल व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य तलाठी सुर्वे, ग्रामविकास अधिकारी संजय भोते, हर्षवर्धन बागल, नानासाहेब मंडलिक, विनायक शिंदे, सुखदेव कोळी, ग्रामपंचायतचे कर्मचारी अस्लम शेख या कारवाई पथकात होते.

Web Title: Action on unlicensed, unlicensed walkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.