शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:09 IST

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग एक व दोनमधील पात्र शिक्षकांच्या माहितीची तपासणी करुन दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बदली रद्द करून विस्थापित शिक्षकांची सोय करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

ठळक मुद्देबदलीसाठी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवर कारवाईजुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

सांगली : शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग एक व दोनमधील पात्र शिक्षकांच्या माहितीची तपासणी करुन दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बदली रद्द करून विस्थापित शिक्षकांची सोय करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.संघटनेचे अध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, अरुण कुंभार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांची भेट घेऊन शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी अभिजित राऊत बोलत होते.जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे जिल्हा परिषद सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्हांतर्गत बदली प्रकियामध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या समुपदेशनासाठी यादी प्रसिद्ध करावी, समुपदेशन प्रकियेबाबत मार्गदर्शक सूचना, नकार देण्याच्या संधीबाबत माहिती द्यावी, जिल्ह्यांतर्गत बदली प्रकियेत संवर्ग एक व संवर्ग दोनमधून लाभ घेतलेल्या सर्व शिक्षकांचे ते संवर्ग एक व दोनमध्ये पात्र असल्याबाबतचे सिद्ध करणाºया पुराव्यांची तपासणी करून संवर्ग एक व दोनमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. या शिक्षकांवर त्वरित कारवाई करून त्याठिकाणी विस्थापित शिक्षकांची सोय करावी, आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये काम करण्यास नकार दिलेल्या बदलीपात्र नसलेल्या शिक्षकांच्या बदल्या प्रशासकीय बाब म्हणून होत आहेत. या शिक्षकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत सध्या शाळेत कार्यरत होते, त्या परिसरातील जवळपासच्या शाळेत अशा शिक्षकांना पदस्थापना द्यावी, काही शाळांमध्ये संच मान्यतेपेक्षा जादा शिक्षक बदलीने गेल्याचे प्रकार झाले आहेत. या शाळांमध्ये पदे मॅपिंग करताना चूक झाली असल्यास या चुकीमुळे शाळेवर आलेल्या शिक्षकांची गैरसोय होणार आहे.

बदलीसाठी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवर कारवाईसांगली : शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग एक व दोनमधील पात्र शिक्षकांच्या माहितीची तपासणी करुन दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बदली रद्द करून विस्थापित शिक्षकांची सोय करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.संघटनेचे अध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, अरुण कुंभार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांची भेट घेऊन शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी अभिजित राऊत बोलत होते.जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे जिल्हा परिषद सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्हांतर्गत बदली प्रकियामध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या समुपदेशनासाठी यादी प्रसिद्ध करावी, समुपदेशन प्रकियेबाबत मार्गदर्शक सूचना, नकार देण्याच्या संधीबाबत माहिती द्यावी, जिल्ह्यांतर्गत बदली प्रकियेत संवर्ग एक व संवर्ग दोनमधून लाभ घेतलेल्या सर्व शिक्षकांचे ते संवर्ग एक व दोनमध्ये पात्र असल्याबाबतचे सिद्ध करणाºया पुराव्यांची तपासणी करून संवर्ग एक व दोनमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. या शिक्षकांवर त्वरित कारवाई करून त्याठिकाणी विस्थापित शिक्षकांची सोय करावी, आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये काम करण्यास नकार दिलेल्या बदलीपात्र नसलेल्या शिक्षकांच्या बदल्या प्रशासकीय बाब म्हणून होत आहेत. या शिक्षकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत सध्या शाळेत कार्यरत होते, त्या परिसरातील जवळपासच्या शाळेत अशा शिक्षकांना पदस्थापना द्यावी, काही शाळांमध्ये संच मान्यतेपेक्षा जादा शिक्षक बदलीने गेल्याचे प्रकार झाले आहेत. या शाळांमध्ये पदे मॅपिंग करताना चूक झाली असल्यास या चुकीमुळे शाळेवर आलेल्या शिक्षकांची गैरसोय होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली