लसीकरण न केलेल्या आस्थापनांवर आजपासून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:38+5:302021-09-17T04:32:38+5:30

सांगली : महापालिका क्षेत्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या लसीकरणाची तपासणी शुक्रवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी उपायुक्त राहुल रोकडे ...

Action on non-vaccinated establishments from today | लसीकरण न केलेल्या आस्थापनांवर आजपासून कारवाई

लसीकरण न केलेल्या आस्थापनांवर आजपासून कारवाई

सांगली : महापालिका क्षेत्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या लसीकरणाची तपासणी शुक्रवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नियुक्ती केल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. बुधवारी झालेल्या महालसीकरण अभियानात एका दिवसात १९२५५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

अनेक आस्थापना आणि बांधकामावरील कामगारांनी लसीकरण केले आहे की नाही याची तपासणी आजपासून प्रशासन करणार आहे. ज्याठिकाणी लसीविना काम करणारे कामगार आढळून येतील तिथे आस्थापनाधारकावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्तांची पथके तयार केली आहेत. कामगारांनी लस घ्यावी असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Web Title: Action on non-vaccinated establishments from today