जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:51+5:302021-07-17T04:21:51+5:30
सांगली : जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीवर पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे. गुरुवारी पलूस, भिलवडी व उमदी पोलिसांनी दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. ...

जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर कारवाई
सांगली : जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीवर पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे. गुरुवारी पलूस, भिलवडी व उमदी पोलिसांनी दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. पलूस येथे १३ लिटर गावठी दारू, भिलवडी येथे देशी दारूच्या १३ बाटल्या, तर उमदी येथे १२ बाटल्या दारू जप्त करण्यात आल्या.
-------
पलूसमध्ये जुगार अड्ड्यावर कारवाई
सांगली : पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणाहून रोख ११०० रुपयांसह इतर मुद्देमाल जप्त करीत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------
सांगलीत पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई
सांगली : कोरोना रुग्णसंख्या कायम असल्याने प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. तरीही शहरातील राम मंदिर चौक, विश्रामबाग चौक आणि लक्ष्मी मंदिर परिसरात रस्त्याकडेला कांदा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना समज देऊन माल घेऊन विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले.