तीन नवरात्र मंडळांवर डॉल्बीप्रकरणी कारवाई
By Admin | Updated: October 25, 2015 00:40 IST2015-10-25T00:40:12+5:302015-10-25T00:40:12+5:30
पोलिसात गुन्हा : अन्य मंडळेही रडारवर

तीन नवरात्र मंडळांवर डॉल्बीप्रकरणी कारवाई
मिरज : मिरजेत नवरात्रोत्सव मिरवणुकीत विनापरवाना डॉल्बीचा वापर करणाऱ्या हिंदू एकता, सर्वोदय व लोणार समाज या तीन मंडळांचे पदाधिकारी व डॉल्बीचालकांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दोन डॉल्बी यंत्रणा, ट्रॅक्टर, शहरात डॉल्बी बंदीची कठोर अंमलबजावणी सुरू असतानाही नवरात्रोत्सवात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा जोरदार वापर करण्यात आला. गुरुवारी विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचे निर्बंध झुगारुन सार्वजनिक नवरात्र मंडळांनी डॉल्बीचा वापर केला. पोलिसांनी याप्रकरणी हिंदू एकता नवरात्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी बाबूराव दुधाळ, उपाध्यक्ष विनोद शंकर कांबळे (रा. गोठण गल्ली) व डॉल्बीमालक नंदू मंजुनाथ कोळी (रा. शास्त्री चौक, मिरज) ट्रॅक्टरचालक जुबेर सय्यद काझी, वासिम मेहेबूब शेख (रा. शास्त्री चौक, मिरज), सर्वोदय नवरात्र मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेणुका विलास दबडे, उपाध्यक्षा विजया मनोहर कांबळे, सदस्य अजिंक्य सर्वदे (रा. उदगाव वेस), डॉल्बीमालक रूपेश आप्पासाहेब मगदूम (रा. शिवाजी स्टेडियमजवळ, कोल्हापूर), लोणार समाज नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चंद्रकांत गौड, उपाध्यक्ष प्रल्हाद सुनील घाटगे (रा. लोणार गल्ली, मिरज), डॉल्बीमालक चैतन्य चौगुले, संत रोहिदास मंडळाचे अध्यक्ष अनिल सातपुते, गोंधळी समाज मंडळाचे अध्यक्ष विशाल गुरव, उपाध्यक्ष किरण भोसले, भारतमाता मंडळाचे अध्यक्ष दिनेश कदम, उपाध्यक्ष राजकुमार तोडकर, अशा १७ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)