शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागज फाट्यावर चोरटे जेरबंद, स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:46 IST

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून चोरट्यांची टोळी जेरबंद केली. एकूण चारजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देछापा टाकून केली चारजणांची टोळी जेरबंद १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू

सांगली , दि. २६ : कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून चोरट्यांची टोळी जेरबंद केली. एकूण चारजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणखी एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

रमेश शंकर नाईक (वय २६, रा. कलोती, ता. अथणी), विजयकुमार ऊर्फ आकाश शंकर पाटील (२१, रा. डफळापूर, ता. जत), सतीश शिवाजी कोळी (२७, घाटनांद्रे) व रोहित कोळी (२५, रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दरोडे, मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने यांनी पेट्रोलिंगचे आदेश दिले होते.

 

१८ आॅक्टोबर रोजी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पेट्रोलिंग करीत असताना खास बातमीदाराकडून चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नागज फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून रमेश नाईक याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाली.

पोलिसांनी विजयकुमार पाटील, सतीश कोळी व रोहित कोळी या तिघांना ताब्यात घेतले. या चौघांकडून दोन किलो १३० ग्रॅम चांदीचे दागिने, २१ ग्रॅम ८२० मिलिग्रॅम सोन्याचे दागिने, सोनार कानस, डायऱ्या , अंगठी, रॉड असे साहित्य व गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल असा एकूण १ लाख ७६ हजार ८१० रुपयांचा माल हस्तगत केला. ही कारवाई निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून करण्यात आली.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा