गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या चाैघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:26+5:302020-12-05T05:07:26+5:30

सुखदेव हनुमंत नाईक व पपलेश महादेव पाटील (दोघे रा. आरग, ता. मिरज), प्रवीण रावसाहेब सुतार, लोकेश रावसाहेब सुतार (दोघे ...

Action on Chaighas carrying village pistols | गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या चाैघांवर कारवाई

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या चाैघांवर कारवाई

सुखदेव हनुमंत नाईक व पपलेश महादेव पाटील (दोघे रा. आरग, ता. मिरज), प्रवीण रावसाहेब सुतार, लोकेश रावसाहेब सुतार (दोघे रा. लिंगनूर, ता. मिरज) हे गुरुवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास सलगरे हद्दीत बेळंकी-सलगरे मार्गावर संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आढळले. यावेळी सुखदेव नाईक, प्रवीण सुतार यांना पकडले, तर लोकेश सुतार व पपलेश पाटील यांनी पलायन केले.

पोलिसात पोलीस नाईक सुहास मोहिते यांनी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे, पोलीस अंमलदार विजय घोलप, आनंदा जाधव, ज्ञानेश्वर पुणेकर, सुहास मोहिते, प्रशांत मोहिते यांनी कामगिरी केली.

Web Title: Action on Chaighas carrying village pistols