शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘समाजकल्याण’च्या २७ शिपायांची भरती रद्द राज्य आयुक्तांची कारवाई : नियमबाह्य प्रक्रिया; तिघा अधिकाऱ्यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:38 IST

समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेली २७ शिपायांची नियमबा भरती राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी रद्द केली आहे.

सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेली २७ शिपायांची नियमबाह्य भरती राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी रद्द केली आहे. या कारवाईमुळे सेवेतील २७ शिपायांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. या भरतीस जबाबदार तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे, प्रभारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, विद्यमान सहायक आयुक्त सचिन कवले यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयातील आणि जिल्तील वसतिगृहामधील शिपाई पदाच्या २७ रिक्त जागांसाठी ७ सप्टेंबर २०१४ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून लगेच लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचदिवशी निवड यादीही प्रसिध्द करण्यात आली. प्रत्यक्षात ही यादी प्रसिध्द करताना निवड समितीचा कोठेही विचार करण्यात आला नाही. निवड समितीला डावलून भरती प्रक्रिया राबविल्याबाबत तक्रारी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. रिक्त जागांची भरती करताना बिंदू नामावलीबाबत महसूल विभागाच्या सहायक आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आली नाही. शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविताना पारदर्शक पध्दतीचा अवलंब करणे अभिप्रेत असताना, सामान्य प्रशासनाच्या नियमांचे पालन झाले नाही.

दि. २७ एप्रिल २०१०च्या शासन निर्णयानुसार संबंधित जबाबदार अधिकाºयांच्या सूचनेनुसार निवड समिती गठित करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात घाटे यांनी स्वत:च समिती नियुक्त केली. समितीमधील सदस्य गैरहजर असतानाही भरती प्रक्रिया राबविली. भरती प्रक्रिया राबविताना समाजकल्याण आयुक्त, उपायुक्त कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही. या सर्व मुद्यांचा विचार करता, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी कारवाई का करू नये, याबाबतचा खुलासा समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी घाटे यांना मागितला आहे.

या समितीमधील इतर दोघे सदस्य प्रभारी सहायक आयुक्त देवढे, विद्यमान सहायक आयुक्त कवले यांनीही कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे, त्यांची चार दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.आयुक्त शंभरकर यांनी समाजकल्याण विभागाच्या पुण्यातील प्रादेशिक उपायुक्तांना सांगली येथील सहायक आयुक्त कार्यालयातील २७ शिपाई पदांची भरती रद्द करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. समाजकल्याण आयुक्तांच्या कारवाईमुळे येथील सहायक आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे.अधिकारी, कर्मचाºयांविरुध्द दोषारोप सादर करासमाजकल्याण विभागाच्या सांगली येथील सहायक आयुक्त कार्यालयातील २७ शिपाई पदांच्या भरतीच्या चौकशी अहवालामध्ये अधिकारी, कर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार नोकर भरतीमध्ये दोषी अधिकारी, कर्मचाºयांविरुध्द दोषारोप निश्चित करून तात्काळ आयुक्त कार्यालयास अहवाल सादर करण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी प्रादेशिक उपायुक्तांना दिले आहेत. या कारवाईचा अहवाल दहा दिवसात आयुक्त कार्यालयात सादर झाला पाहिजे, अशाही सूचनाही दिल्या आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगलीjobनोकरीzpजिल्हा परिषद