वाटेगावमध्ये नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:26 IST2021-05-09T04:26:24+5:302021-05-09T04:26:24+5:30

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच सुरेश साठे व समितीतील सदस्य रस्त्यावर येऊन विनाकारण ...

Action against violators in Wategaon | वाटेगावमध्ये नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

वाटेगावमध्ये नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच सुरेश साठे व समितीतील सदस्य रस्त्यावर येऊन विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.

गावामध्ये जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळत आहे.

औषध दुकाने व रुग्णालय वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या परिसरामध्ये जाऊन त्या कुटुंबातील लोकांचे व रुग्णांचे प्रबोधन केले जात आहे. यासाठी सरपंच सुरेश साठे, ग्रामविकास अधिकारी सुरेश सातवेकर, तलाठी जगन्नाथ कदम, पोलीस पाटील संतोष करांडे, ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव परिश्रम घेत आहेत. ग्रामपंचायत सदस्य के. जे. पाटील, बाळासाहेब खराडे, हारुण मुल्ला, काकासोा लोहार, महादेव पेटकर, मच्छिंद्र साठे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.

Web Title: Action against violators in Wategaon