आटपाडी तालुक्यात वाळू तस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:39+5:302021-06-11T04:18:39+5:30
वाळू तस्करी करणारी वाहने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाकडे जमा केली आहेत. दि. ८ आणि ९ जूनला महसूल विभागाच्या पथकांनी ...

आटपाडी तालुक्यात वाळू तस्करांवर कारवाई
वाळू तस्करी करणारी वाहने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाकडे जमा केली आहेत.
दि. ८ आणि ९ जूनला महसूल विभागाच्या पथकांनी ही कारवाई केली. कौठुळी येथील माणगंगा नदीपात्रामधील अनाधिकृत वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचा नितीन लक्ष्मण बालटे (रा. आटपाडी) यांचा ट्रॅक्टर जप्त केला आहे. कौठुळी हद्दीमध्ये पथकाला पाहताच अनाधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक करणारे वाहन चालक हे वाळूने भरलेल्या दोन ट्रॉली ओढापात्रात सोडून ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. ही वाहने कोणाच्या मालकीचे आहेत याबाबत प्रशासन माहिती घेत आहे.
निंबवडे येथील वाघमोडे वस्ती येथे महादेव दुर्योधन बुधावले (रा. निंबवडे) यांच्या मालकीचे वाहन (एम. एच. १२ एफ. सी. २१) जप्त केले आहे.
ही कारवाई तहसीलदार सचिन मुळीक, निवासी नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखली तलाठी आर. एस. कांबळे, सुधाकर केंगार, पी. एन. आडसूळे, एम. जे. देशमुख, तलाठी हिवतड, विजय पाटील, संजय माने, बिरुदेव जावीर, शिवाजी पुसावळे यांच्या पथकाने केले.