जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री, जुगारावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:29+5:302021-02-20T05:15:29+5:30

सांगली : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरूच ठेवली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी जुगारासह बेकायदा दारू ...

Action against illegal sale of liquor and gambling in the district | जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री, जुगारावर कारवाई

जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री, जुगारावर कारवाई

सांगली : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरूच ठेवली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी जुगारासह बेकायदा दारू विक्री करणाऱ्या अड्डयांवर छापे टाकून संशयितांवर कारवाई केली आहे.

बेकायदा दारूची विक्री केल्याप्रकरणी १८ ठिकाणी छापे मारून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये नारायण चव्हाण (कुरळप), तौफिक मुजावर (कवठेपिरान) , सोनकिरे (कडेगाव) येथे सचिन ऊर्फ सुनील पाटील, काकासाहेब ऐवळे (विटा) , अनिल कांबळे (सलगरे ता. मिरज), हणमंत कोळेकर (नांगोळे) , शिंगणापूर (जत) येथे लक्ष्मी नाईक, उत्तम एडके, रमेश सोळवंडे (कुंडल) यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

जुगारप्रकरणी उमदी येथे महेश मारुती काटे (जत), हरिपूर येथे हाबेल शशिकांत कांबळे (रा. खणभाग), विलास लक्ष्मण ढोले (आष्टा), बामणोली (कुपवाड) येथे अंकुश पांडुरंग साळुंखे, पिंटू ऊर्फ सचिन पांडुरंग साळुंखे, आकाश लोहार, सुलेमान रेहमान पठाण (पलूस), शमशोद्दीन नबीसाब शरीकमसलत (मिरज), कुरळप येथे पांडुरंग शंकर कांबळे, कडेगाव येथे कृष्णात सर्जेराव देशमुख, शहरातील कर्नाळ रस्ता परिसरात देवदान शशिकांत पाटोळे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Web Title: Action against illegal sale of liquor and gambling in the district