सांगली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. विनामास्क फिरणाऱ्या ६९ जणांवर कारवाई करीत ११ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला.महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आयुक्तांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश विशेष पथकाला दिले. त्यानुसार मंगळवारपासून पथकाद्वारे कारवाईला सुरूवात झाली.दिवसभरात सांगलीत २५ व्यक्तीकडून ४ हजार ४००, मिरजमध्ये २५ व्यक्तीकडून ४६०० तर, कुपवाडमध्ये १९ व्यक्तीकडून २७०० रुपये दंड. वसुल करण्यात आला. वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. रविंद्र ताटे व वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, सहाय्यक आयुक्त सचिन पाटील, दत्तात्रय गायकवाड, सहदेव कावडे, सावंता खरात यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.कारवाई सातत्य राहिल : आयुक्त कापडणीसमहापालिका क्षेत्रात सध्या नव्यांने कोविडचे रुग्ण सापडत आहेत. कोविडच्या संसर्ग वाढू नये, यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. जे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या मोहिमेत सातत्य राहिल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
सांगलीत विना मास्क फिरणाऱ्या ६९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:50 IST
coronavirus, mask, muncipaltycarporation, sangli कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. विनामास्क फिरणाऱ्या ६९ जणांवर कारवाई करीत ११ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला.
सांगलीत विना मास्क फिरणाऱ्या ६९ जणांवर कारवाई
ठळक मुद्देसांगलीत विना मास्क फिरणाऱ्या ६९ जणांवर कारवाई महापालिकेकडून दंड : बारा हजार रुपयांची वसुली