लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: शिराळा पोलिसांनी शुक्रवारी ४६ विनामास्क, ५९ दुचाकींवर कारवाई करून २७ हजार रुपये दंड वसूल केला असून १६ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद होते.
पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांनी सांगितले की, विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच फिरु नये. तोंडाला मास्क लावूनच अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे. विनामास्क आढळून आलेल्या ४६ जणांकडून २३ हजार, तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने ५९ जणांकडून ३ हजार ८०० रुपये असा एकूण २६ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे आणि १६ दुचाकी वाहने ताब्यात घेतली आहेत. दिवसभरात एसटीच्या इस्लामपूर मार्गावर दोनच फेऱ्या झाल्या. मात्र इतर सर्व फेऱ्या प्रवासी नसल्याने रद्द करण्यात आल्या.