शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

लॉकडाऊनमुळे अशी वेळ आली... अन्यथा तीन लाखांचे नुकसान झाले नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:37 IST

कोंगनोळी येथील शेतकरी राजू पोतदार यांचे एक एकर पेरुचे फळबाग क्षेत्र आहे. त्यांनी अतिशय कष्टाने यावर्षी पेरुची बाग लावून चांगले उत्पन्न आणले होते. दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ऐन फळ तोडणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण झाले.

ठळक मुद्देएकरभर बागेतील पेरू सडले! मार्केट नसल्याने फेकून दिलेसंपूर्ण पेरु फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

शिरढोण (जि. सांगली) :  कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकरी राजू पोतदार यांची सुमारे एक एकर क्षेत्रात पेरूची बाग असून,पेरू पिकून झाडावरून खाली पडायला लागले आहेत. ते सडत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व मार्केट बंद असल्याने पेरुचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

पोतदार यांनी मोठा खर्च करून ही पेरूची बाग वाढवली होती. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने मार्केट बंद आहे. राजू पोतदार या शेकऱ्यावर अक्षरशः पेरू फेकून देण्याची वेळ आली आहे.

कोंगनोळी येथील शेतकरी राजू पोतदार यांचे एक एकर पेरुचे फळबाग क्षेत्र आहे. त्यांनी अतिशय कष्टाने यावर्षी पेरुची बाग लावून चांगले उत्पन्न आणले होते. दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे ऐन फळ तोडणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण झाले. त्याच बरोबर संपूर्ण मार्केटही बंद असल्याने पेरू पिकून झाडावरून खाली पडत आहेत, खराब होत चालले आहेत.मार्च, एप्रिल या महिन्यात पेरुचा हंगाम सुरू असतो.

ऐन हंगामात सर्व पेरू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मालास चांगली मागणी येईल, चार पैसे हाती लागतील या अपेक्षेने पेरू बागायत शेतकऱ्यांनी पेरु उत्पादन केले होते. काही बागायदारांनी सोसायटी, पतसंस्था, बँकेमधून कर्ज काढून बागा लावल्या आहेत.कोरोनाच्या या संकटामुळे मजूर नाहीत, बाजरपेठ उपलब्ध नाही त्यामुळे संपूर्ण पेरु फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पोतदार यांनी पेरु रस्त्यावर व मळ्यात टाकून दिले आहेत. पर्यायाने सुमारे तीन लाखांचे त्यांचे नुकसान झाले आहे.आम्ही पेरू बागायत शेतकरी आधीच कर्जाने हतबल झाले असून त्यात कोरोनामुळे हातातोंडाला आलेले फळ आता फेकून देण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे माझ्यासारख्या अन्य पेरू बागायतदारांचे आर्थिक नुकसान मोठे झाले आहे. : राजू पोतदार. पेरूबागायत शेतकरी कोंगनोळी.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीSangliसांगली