शीतल पाटीलसांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी विष्णू मारुती माडेकर (वय २३, मुळ रा. धुळखेड, ता. इंडी, जि. विजापूर) याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला.आटपाडी तालुक्यातील एका गावात आरोपी विष्णू माडेकर हा सालगडी म्हणून काम करीत होता. पिडीत तेरा वर्षाची मुलीवर त्याने लैगिंक अत्याचार केला. भीतीपोटी पिडीतीने ही घटना कुणालाही सांगितली नाही. काही दिवसाने तिला उलट्या व मळमळ होऊ लागल्याने वैद्यकीय तपासणी केली असता ती दोन महिन्याची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर पिडीताच्या आईने माडेकर याच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. पिडीत मुलींची न्याय वैज्ञानिक अहवाल, वैद्यकीय पुरावा, पिडीतेचा जबाब ग्राह्य धरून विष्णू माडेकर याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
सांगली: अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी, आरोपी कर्नाटकातील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 18:53 IST