चार वर्षांपासून पसार आरोपीस बेडगमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:40+5:302021-05-30T04:22:40+5:30
सांगली : कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील चार वर्षांपासून पसार असणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेेेषण शाखेच्या पथकाने अटक ...

चार वर्षांपासून पसार आरोपीस बेडगमध्ये अटक
सांगली : कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील चार वर्षांपासून पसार असणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. रोहित बाबासाहेब भोसले (वय २९, रा. बेडग) असे संशयिताचे नाव असून, बेडग येथे बसस्थानक परिसरात फिरत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले.
जिल्ह्यातील पसार असलेल्या आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक बेडग परिसरात गस्तीवर होते. यावेळी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०१७ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी तिथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथककाने त्यास ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, जितेंद्र जाधव, राजाराम मुळे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.