मिरजेत खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:20+5:302021-05-13T04:27:20+5:30

मिरज : मिरजेतील मंगळवार पेठेत अक्रम शेख या तरुणाच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी मोअज्जम ऊर्फ मोजा शेख ...

Accused in Miraj murder case commits suicide | मिरजेत खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

मिरजेत खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

मिरज : मिरजेतील मंगळवार पेठेत अक्रम शेख या तरुणाच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी मोअज्जम ऊर्फ मोजा शेख (वय २७ रा. मंगळवार पेठ, मिरज) याने मंगळवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली.

मोअज्जम शेख व साथीदारांनी वैमनस्यातून चार वर्षांपूर्वी मंगळवार पेठेतील एका कॅरम क्लबमध्ये गावठी पिस्तुलाने गोळ्या घालून व कोयत्याने वार करून अक्रम शेख याचा भरदिवसा खून केला होता. याप्रकरणी मोअज्जमसह दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. कोरोना साथीमुळे महिन्यापूर्वी मोअज्जम याची पॅरोलवर सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर त्याने विवाह केला होता. गेले आठ दिवस तो घरात कोणाशी बोलत नव्हता. मंगळवारी त्याने खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.

Web Title: Accused in Miraj murder case commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.