शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप, चारित्र्याच्या संशयावरून घातला होता डोक्यात दगड

By शीतल पाटील | Updated: May 2, 2023 19:25 IST

पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता.

सांगली : चारित्र्याच्या संशयावरून दगड डोक्यात घालून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी पती रामचंद्र विठोबा हाके (रा. वाघमोडेनगर, कुपवाड) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीस आर. एन. माजगावकर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती ए. व्ही कदम यांनी काम पाहिले.याबाबत माहिती अशी की, रामचंद्र हाके हा पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. २९ जुलै २०२० रोजी रात्री साडेअकरा वाजता त्याने दरवाजा अडविण्यासाठी ठेवलेला दगड टाॅवेलमध्ये बांधून पत्नीच्या डोक्यात वार केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्यादिवशी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांत आरोपी हाकेविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्यात १७ साक्षीदार तपासण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा, फिर्यादीचा जबाब, साक्षीदारांचे टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रामचंद्र हाके याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात पोलिस हवालदार अशोक कोळी, सहाय्यक निरीक्षक अशोक तुराई, वंदना मिसाळ, रेखा खोत, सुप्रिया भोसले यांनी सहकार्य केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय