देववाडीतील महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:18 IST2021-02-05T07:18:59+5:302021-02-05T07:18:59+5:30

शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथे शेतामध्ये एकटी महिला पाहून तिच्यावर जबरदस्ती करताना त्यास विरोध केला म्हणून तिला ...

Accused in Devwadi woman's murder case remanded in custody | देववाडीतील महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीस कोठडी

देववाडीतील महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीस कोठडी

शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथे शेतामध्ये एकटी महिला पाहून तिच्यावर जबरदस्ती करताना त्यास विरोध केला म्हणून तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याप्रकरणी संशयित निवास उर्फ धनाजी पंडित खोत (वय २२) यास दिनांक ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, गुरुवार दिनांक २१ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मृत महिला देसकत येथील उसाच्या शेतात पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या एकट्याच आहेत हे पाहून संशयित निवास उर्फ धनाजी याने त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने त्यास विरोध केला. संशयित निवास उर्फ धनाजी याने त्यांना विहिरीत ढकलून देऊन खून केला होता. या घटनेबाबत महिलेच्या पतीने शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तपास करीत आहेत. निवास उर्फ धनाजी खोत यास गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दिनांक ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Accused in Devwadi woman's murder case remanded in custody