स्वत:चे गुन्हे लपविण्यासाठी जगतापांकडून आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:04+5:302021-09-06T04:30:04+5:30
जत : माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी आमदार विक्रम सावंत यांचा कोणताही संबंध नाही, ...

स्वत:चे गुन्हे लपविण्यासाठी जगतापांकडून आरोप
जत : माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी आमदार विक्रम सावंत यांचा कोणताही संबंध नाही, आपली गुन्हेगारी लपविण्यासाठी आमदार सावंत यांच्यावर आरोप केला जात असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळ युवराज निकम, भूपेंद्र कांबळे, संतोष पाटील, नाना शिंदे, बाबासाहेब कोडग, महादेव पाटील, मारुती पवार, नीलेश बामणे, नाथा पाटील, अशोक बननेनावर, साहेबराव कोळी, परशुराम मोरे, महादेव कोळी, राजू यादव उपस्थित होते.
त्यांनी सांगितले, विलासराव जगताप यांच्यावर १९८८पासून १९९७पर्यंत ३२ फोजदारी गुन्हे दाखल आहेत. ते हे विसरले का? याच गुन्ह्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर कोणताही दोष नसताना त्यांच्या चुकीच्या कृतीमुळे त्यांच्या स्वतःच्या गावातही दुर्दैंवी घटना घडत आहे. याला ते स्वत:च कारणीभूत आहेत. २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने निवडून दिलेले प्रकाश शेंडगे ऐनवेळी राष्ट्रवादीकडून उभे राहिल्यामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. तो पराभव स्वीकारूनसुद्धा आम्ही जनतेच्या संपर्कात राहिल्यामुळे आमच्या पक्षाचे आमदार ३५ हजार इतक्या मताधिक्क्याने निवडून आले.
हा विजय व आपला पराभव जगताप यांना पचत नसल्याने काँग्रेसचे आमदार सावंत यांच्यावर ते खोटे आरोप करत आहेत. विजयपूर पोलिसांना पुरावा मिळाल्याने तिथे गुन्हा दाखल झाला आहे. याचे खापर आमदार सावंत यांच्यावर फोडणे बरोबर नाही. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. त्याठिकाणी आमदार विक्रम सावंत यांची काय ताकद पोहोचणार आहे. याचा विचार न करता आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे आरोप होत आहेत.