कोरोनाच्या अफवेने शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:43+5:302021-03-04T04:49:43+5:30

वाळवा : जानेवारी उजाडला आणि कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली. विदर्भ व मराठवाड्यात काही रुग्णही आढळून आले. ...

According to Corona, farmers are poor, traders are wealthy | कोरोनाच्या अफवेने शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल

कोरोनाच्या अफवेने शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल

वाळवा : जानेवारी उजाडला आणि कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली. विदर्भ व मराठवाड्यात काही रुग्णही आढळून आले. इकडे मुंबई, पुणे येथेपर्यंत त्याचे लोण वाढले. रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली, तसे द्राक्ष बागायतदार यांच्या द्राक्षेचे दर व्यापाऱ्यांनी कोसळून टाकले. शेतकरी कंगाल होऊ लागला आहे आणि व्यापारी मात्र मालामाल होऊ लागला आहे.

वाळवा येथे चार हजार एकर काळी शरद सिडलेस द्राक्ष बागा आहेत. येथे पांढऱ्या सोनाक्काच्या द्राक्षबागा जवळपास नाहीत. २०१९ पासून हे तिसरे वर्ष आहे की, शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. महापूर, अवकाळी पाऊस, बदलते हवामान, रोगराई याला तोंड देऊन बागा वाचविल्या जातात; परंतु कोरोनाने व्यापारी द्राक्षाचे दर पाडत आहेत. चांगल्या दर्जाच्या द्राक्षाला चार किलोला २८० रुपये दर होता. कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ आणि वारंवारच्या ढगाळ हवामानामुळे चार किलो पेटीला १८० रुपये दर झाला आहे.

Web Title: According to Corona, farmers are poor, traders are wealthy